भीम गीत - मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा - लिखित | Mala Chid Yet Nahi Hach Majha Gunha Lyrics - Biim Song

मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा  

मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा..
दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा.
मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा..

एक होता माझा गाव आणि माझे गाव कर
माझा भीमा असताना कापायचे थर थर
गेला गेला भीम राणा
आला नेभाळटपना दोष देऊ कुणा
दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा.
मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा..

क्रूर कठोर काळाशी जरि गाठ होती माझी
भीम माझा मधी होता मान ताठ होती माझी
आज माझातला भीम इथ मीच केला उना
दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा.
मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा..

माझ्या पोटच्या पोरीची लाज लोकात लुटते
डोळे पाहतात माझे काया कापत सुटते
माझा नेभाळटपणा माझ्या लाचारीने गुणा
दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा.
मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा..

जीता जळे माझा भाऊ माझ्या झोपडी सहित
काय झाले काय नाही नोंद होई ना वहीत
आज मीच माझ्या पाऊलांच्या बुजवितो खुणा
दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा.
मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा..
दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा.

- कवि : लोकशाहीर वामनदादा कर्डक